समुद्रात आढळणाऱ्या रहस्यमयी आणि सुंदर जीवापैकी एक म्हणजे जेलीफिश मासा. जेलिफिशच्या अनेक जाती अस्तित्वात आहेत. मुंबईकरांना जेलीफिश हे फक्त त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळेच माहिती असावेत. परंतु तुम्हाला आम्ही असा जेलीफिश दाखवणार आहोत ज्याला पाहता क्षणी तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. सध्या सोशल मीडियावर एका दुर्मिळ जातीच्या जेलीफिशचा व्हिडिओही पाहायला मिळत आहे.या जेलीफिशचा रंग गुलाबी व निळा असून तो फारच आकर्षक दिसत आहे. हा जेलीफिश मॅक्सिको तील सॉकोरो आयलंड मधील समुद्रात आढळला गेला आहे. विशेष म्हणजे संशोधकांनी जेलीफिशचे नामकरणही केले असून ‘हलिताप्रेस मासी’ असे त्याचे नाव ठेवण्यात आले आहे. १२२५ मीटर खोल समुद्रात हा जेलीफिश आढळला असून तो अगदी फटाक्याप्रमाणे दिसतो.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews